"आम्ही भोसरीकरांचा मानवतेचा संदेश" पूरग्रस्तांना मदतीचा हात..
भोसरी (सह्याद्री बुलेटिन ) - कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी येथील आम्ही भोसरीकर संस्थेच्या वतीने पुरग्रस्तांना मदत म्हणून दोनशे पाण्याचे बॉक्स, १०० पोती तांदूळ, ३५० जैकेट, ३०० ब्लँकेट, ५० पोती कपडे, ८ पोती मुरमुरे, १०० बाटली फिनाईल, ५० किलो फरसाण, थंडी तापाची औषधे, २०० चपला, १०० बिस्कीट, २७८ नव्या साडया, २८६ लहान मुलांची नविन ड्रेस, ड्रेस, २५ पोती जुनी चांगली कपडे रवाना करण्यात आली आहेत.
कोल्हापूर सांगली व सातारा जिल्ह्यातील पावसाने आलेल्या पुराची माहिती सोशल मीडिया, इलेक्ट्रॉनिक माध्यम, वर्तमानपत्रांमधून पाहून या भयानक परिस्थितीत तेथील पूरग्रस्त नागरिकांना माणुसकीच्या आधाराची गरज भोसरीतील आम्ही भोसरीकर या संस्थेच्या सदस्यांनी ओळखली आणि पूरग्रस्तांना मदत करण्याचे आवाहन त्यांनी भोसरी परिसरात केले. तरुणांनी पुढाकार घेतलेल्या या कामास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आणि दिवसभरातच सर्व जीवनावश्यक वस्तू जमा करण्यात आल्या. आम्ही भोसरीकर च्या सर्व सदस्यांनी आणि भोसरीकरांनी दाखवलेल्या या माणुसकीमुळे पिंपरी चिंचवड शहरात त्यांचे कौतुक होत असून पूरग्रस्तांवर ओढवलेल्या संकट प्रसंगी मदत करण्याची भावना सर्वांमध्ये जागृत व्हावी व सर्वांनी पूरग्रस्त बांधवांना मदत करावी असे आवाहन आम्ही भोसरीकर च्या सदस्यांनी केले आहे.